Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकही क्रिकेट सामना पाहिला नाही

एकही क्रिकेट सामना पाहिला नाही

वेबदुनिया

WD
आजवरच्या आयुष्यात अजून मी एकही क्रिकेट सामना पाहिलेला नाही. एक दिवस तो बघायची इच्छा आहे असे विश्व नंबर वन बॅडमिंटनपटू ली चोंग वी ने म्हटले आहे. आयबीएल स्पर्धेत पहिला सामना खेळल्यानंतर तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बरोबर बातचित करीत होता.

ली म्हणाला, मी सचिनला पहिल्यांदाच भेटलो. माझा सामना पाहण्यासाठी तो आला होता. सामन्यानंतर त्याने माझी भेूट घेतली. आता मी सुद्धा एक दिवस क्रिकेट सामना पाहणार आहे. ली ला मंबई मास्टर्सने खरेदी केले आहे. दुखापतीमुळे तो दोन सामने खेळू शकला नव्हता. पुरुष एकेरीत त्याने आपल्याच देशाच्या डॅरेन लीव ला २१-१२, २१-१६ असे ३५ मिनिटात पराभूत केले. ऑलिम्पिकमध्ये त्याने दोन रौप्य पदके जिंकली आहेत.

वेईची विजयी सुरूवात

सर्वोच्च मानंकित पुरुष बॅडमिंटन खेळाडू मलेशियाच्या ली चोंग वेई ने मुंबई स्पोट्र्स कॉम्पलेक्स परिसरात खेळल्या जाणा-या इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल) च्या पहिल्या सत्रातील तिस-या टप्प्याच्या सामन्यात विजयाने सुरूवात केली.वेई ने पहिल्या पुरुष एकेरी सामन्यात क्रिश दिल्ली स्मेशर्सच्या लियू दारेनला नमवून मुंबई मास्टर्स संघाला १-० ने आघाडीवर आणले. वेई ने हा सामना २१-१२, २१-१६ ने जिंकले. हा सामना ३७ मिनीटे चालला.वेईने या महिन्यात चीनमध्ये आयोजित विश्व चॅम्पियनशिपच्या एकेरी वर्गाच्या अंतिम लढतीत तो जखमी झाला होता आणि यामुळे तो या लीगचे दिल्ली टप्पा आणि लखनौ टप्प्यता सहभाग घेऊ शकला नव्हता.मास्टर्सला दुसरा विजय हवा आहे तसेच स्मैशर्स दिल्लीमध्ये पराभूत झाल्यानंतर लखनौमध्ये विजय नोंदवून आता त्याचे ध्येय हे विजय कायम ठेवण्याचे राहील. दोन्ही संघाच्या खात्यात ६-६ अंक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi