Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑलिम्पिकसाठी हॉकी संघ पात्र ठरेल

ऑलिम्पिकसाठी हॉकी संघ पात्र ठरेल

वेबदुनिया

नवी दिली , गुरूवार, 29 सप्टेंबर 2011 (16:58 IST)
भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल, असा विश्‍वास भारताचे नवनियुक्त प्रशिक्षक आणि तीन वेळचे ऑलिम्पियन मुकेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. बंगळुरू येथे ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी सुरू असलेल्या अभ्यास शिबिरात ते प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारतील.

ऑस्ट्रेलिया प्रशिक्षक नोब्ज यांच्यासोबत ते काम करतील. भारताकडून ३0७ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले ४१ वर्षीय मुकेश गुरुवारपासून संघाशी जुडणार आहे. भारताच्या युवा खेळाडूंना अनुभवाचा नक्कीच फायदा होईल, तसेच सुरुवातीपासूनच विदेशी प्रशिक्षकासमवेत सहायक प्रशिक्षक म्हणून काम करण्यास इच्छुक होतो, असेही ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi