Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑस्ट्रेलिन खुले टेनिस : नदालचे स्वप्न भंगले!

ऑस्ट्रेलिन खुले टेनिस : नदालचे स्वप्न भंगले!
मेलबर्न , बुधवार, 28 जानेवारी 2015 (15:53 IST)
स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल याचे ऑस्ट्रेलिन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकण्याचे  स्वप्न उद्ध्वस्त झाले.
 
पुरुष एकेरीच्या उपान्त्पूर्व सामन्यात तिस‍र्‍या स्थानावरील टॉमस बर्डिच याने नदालचा पराभव केला. रशियाची मारिया शारापोव्हाने महिला एकेरीची उपान्त्य फेरी गाठताना नवोदित येऊगेनी बाऊचर्ड हिचा पराभव केला.
 
14 ग्रॅन्डस्लॅम पटकाविणारा नदाल हा उपान्त्पूर्व सामन्यात विजाच्या शर्यतीत नव्हता. 2006 नंतर तो 17 व्या वेळी पराभूत झाला आहे. सातव्या स्थानावरील झेकच्या बर्डिच याने जोरदार सर्व्हिसचा खेळ केला. तसेच आक्रमक फटके मारले आणि नदालचा तीन सेटसमध्ये  6-2, 6-0, 7-6 (7-5) असा पराभव केला. नदालने तिसर्‍या सेटसमध्ये जोरदार झुंज दिली. परंतु वेळ निघून गेली होती. 
 
बर्डिचने गतवर्षीही उपान्त्य फेरी गाठली होती. परंतु उपान्त्य फेरीत तो गतविजेत्या स्टान वावरिंकाकडून पराभूत झाला होता. तिसर्‍या   सेटसनंतर झुंझण्याची माझी तयारी होती, असे बर्डिच म्हणाला. मी सुरुवात चांगली केली परंतु राफालशी खेळत आहात त्यामुळे शेवटच्या गुणापर्यंत झगडणे हे माझे काम होते. मी हा उलटफेर करणारा विजय मिळविला, असे बर्डिच म्हणाला.
 
याऊलट महिला एकेरीत शारपोव्हाने येऊगेनी बाऊचर्डचा 6-3, 6-2 असा पराभव केला. थंड व ढगाळ हवामानात शारापोव्हाला फारसे कष्ट पडले नाहीत. तिने तरुण बाऊचर्डची (सातवी मानांकित) सर्व्हिस पहिल्या गेममध्ये भेदली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. बाऊचर्ड चांगला खेळ करीत होती. तरीही मला विजयाचा विश्वास होता, असे मारिया म्हणाली. ती सहावे ग्रॅन्डस्लॅम जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे.
 
मारियाला एकटेरिना माकारोवा हिच्याशी खेळावे लागेल. माका रोबाने दुसर्‍या उपान्त्यपूर्व सामन्यात तिसर्‍या स्थानावरील सिमोना हालेप (रुमानिया) हिचा 6-4, 6-0 असा पराभव केला. 26 वर्षाच्या माकोरोवाने यापूर्वी येथे दोन वेळा उपान्त्यपूर्व फेरी गाठली. सात प्रयत्नात ती उपान्त्य फेरी गाठू शकली नव्हती.
 
अग्रमानांकित सेरेना विलिअम्स ही गतवर्षी अंतिम फेरी गाठणार्‍या डोमिनिका सिबुलकोव्हाशी खेळेल तर व्हिनस माडिसनशी खेळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi