Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सोमदेवची विजयी सलामी

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सोमदेवची विजयी सलामी

वेबदुनिया

WD
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत सोमदेव देववर्मनने आज (सोमवार) विजयी सलामी दिली. जागतिक क्रमवारीमध्ये वरच्या स्थानावर असलेल्या जर्मनीच्या बियॉं फाऊ याच्यावर सोमदेवने मात केली.

खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे सोमदेव गेल्या काही महिन्यांपासून कोर्टवर उतरलेला नाही. यामुळे जागतिक क्रमवारीतील त्याचे स्थान घसरले होते. फाऊविरुद्ध विजय मिळविल्याने आता त्याच्या क्रमवारीत सुधारणा होईल.

जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये सोमदेव 551 व्या स्थानी आहे, तर त्याचा प्रतिस्पर्धी फाऊ 78 व्या स्थानी आहे. पण ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच दिवशी फाऊला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. सोमदेवने फाऊवर 6-3, 6-2, 6-3 अशी सरळ सेटमध्ये मात केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi