Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जर्मनीविरुध्द रोनाल्डो निश्चितपणे खेळणार

जर्मनीविरुध्द रोनाल्डो निश्चितपणे खेळणार
कॅम्पिनास (ब्राझील) , सोमवार, 16 जून 2014 (12:02 IST)
पोर्तुगालचा गोलरक्षक एडुआड्रो यांनी जर्मनीविरुध्दच्या विश्वचषक फुटबॉल सामन्यात महत्त्वाचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा खेळणार आहे, असे सांगितले. गुडघा दुखापतीमुळे त्याने काल सराव केला नव्हता त्यामुळे महत्त्वाचे सामन्यात रोनाल्डोच्या खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. ही शंका आज दूर झाली. रोनाल्डोने सरावात पूर्णपणे भाग घेतला त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. सराव करताना रोनाल्डोने काळजी घेतली आणि पट्टी बांधलेल्या पायावर जास्त वजन पडू दिले नाही. सॉल्व्हाडोर येथे सोमवारी जर्मनी आणि पोर्तुगाल संघात विश्वचषक साखळी सामना खेळला जात आहे. ख्रिस्तियानो प्रशिक्षणास उत्तम साथ देत आहे. कठीण परिश्रम घेत आहे. आमच्या मदतीसाठी तो या सामन्यात शंभर टक्के तंदुरूस्त होईल असे एडुआड्ररे यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi