Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घ्या रियो ऑलिंपिकच्या सर्वात युवा खेळाडूबद्दल!

जाणून घ्या रियो ऑलिंपिकच्या सर्वात युवा खेळाडूबद्दल!
, गुरूवार, 4 ऑगस्ट 2016 (17:37 IST)
5 ऑगस्टपासून ब्राझीलच्या रियोमध्ये ऑलिंपिक सुरू होणार आहे. रियो ऑलिंपिकमध्ये 207 देशांचे 11,239 धावपटू भाग घेणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की या ऑलिंपिकमध्ये सर्वात युवा धावपटू कोण आहे. यंदा ऑलिंपिकची सर्वात युवा धावपटू भारतातील शेजारील देश नेपाळहून आहे. नेपाळची राहणारी गौरिका सिंह जिचे वय फक्त 13 वर्ष आहे.  
 
वृत्तानुसार, नेपालमध्ये जन्मलेली गौरिका मात्र वयाच्या दोन वर्षातच लंडनला गेली होती. ती मागील वर्षी आलेल्या विनाशकारी भूकंपामधून वाचणारी लोकांमधून एक आहे. गौरिका रविवारी ऑलिंपिक खेळांमध्ये प्रथमच पाय ठेवणार आहे. ती डायविंगमध्ये 100 मीटरच्या  बॅकस्ट्रोक प्रीलिमिनरी स्पर्धेत भाग घेणार आहे.  
 
गौरिकाने नुकतेच हर्थफोर्डशिरेमध्ये आपल्या शाळेतून जिल्हा स्तरीय स्थानीय चँपियनशिप पूर्ण केली. एप्रिल 2015मध्ये गौरिका राष्ट्रीय चँपियनशिपसाठी आपली आई गरिमा आणि लहान भाऊ सौरीनसोबत नेपाल आली होती आणि त्याच दरम्यान देशात विनाशकारी भूकंप आला होता. गौरिकाने म्हटले, तो फारच भितीदायक होता.  
 
आम्ही काठमांडूच्या एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर होते आणि भूकंपच्या वेळेस पळू देखील शकत नव्हतो. म्हणून आम्ही 10 मिनिटासाठी खोलीत ठेवलेल्या एका टेबलाखाली बसलो होतो. ती म्हणाली की ती नवीन इमारत होती, म्हणून इतर इमारतींप्रमाणे ती पडली नाही.  
 
गौरिकाने नेपाल चँपियनशिप प्रतिस्पर्धेत वयाच्या 11 वर्षांपासून भाग घेणे सुरू केले होते. तिनी सात राष्ट्रीय रेकॉर्डपण तोडले आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एनडीआरएफच्या जवानांची बोट उलटली