Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्वाला-दिजूचा पहिल्या फेरीत पराभव

ज्वाला-दिजूचा पहिल्या फेरीत पराभव

वेबदुनिया

लंडन , शनिवार, 28 जुलै 2012 (17:01 IST)
WD
ऑलिंपिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीतील साखळी फेरीत भारताच्या ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

भारताच्या या जोडीचा इंडोनेशियाच्या टोंटोवी अहमद आणि लिलियाना नत्सीर यांनी २१-१६,२१-१२ असा सहज पराभव केला. वेम्बी अरेना य़ेथे झालेल्या या सामन्यात भारतीय जोडीला अवघ्या २५ मिनिटांत पराभवाला सामोरे जावे लागले. 'क' गटातील यासामन्यात भारतीय जोडीला एकदाही वर्चस्व मिळविता आले नाही. इंडोनेशियाच्या जोडीने दोन्ही गेममध्ये वर्चस्व राखत विजय मिळविला. या गटातून पहिले दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र होणार आहेत. त्यामुळे भारतीय जोडीला पुढील दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi