Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट‍ेनिस: प्रार्थना ठोंबरेला दुहेरीत सुवर्णपदक

ट‍ेनिस: प्रार्थना ठोंबरेला दुहेरीत सुवर्णपदक
बार्शी- गुवाहाटी येथे सुरू असलेल्या बाराव्या दक्षिण आशियाई टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या (बार्शी) आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने महिलांच्या दुहेरी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. शिवाय मिश्र दुहेरीच्या सामन्यातही प्रार्थनाने सिल्व्हर पदक पटकावले आहे. दरम्यान, सुवर्णपदक व सिल्व्हर पदकांच्या कमाईमुळे आंततराष्ट्रीय टेनिस वतरुळात प्रार्थना आता ‘भारी’ ठरली आहे.
 
आंतरराष्ट्रीय टेनिस प्रकारात बार्शीला देशाच्या नकाशावर ठळक केलेल्या प्रार्थनाने गुरुवारी झालेल्या या सामन्यात केलेले खेळाचे प्रदर्शन उपस्थित क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. महिला दुहेरीच्या सामन्यात प्रार्थना व शर्मदा बालू (बंगळुरू) या जोडगोळीने मैदानावर पाऊल ठेवल्यानंतर पहिल्या सेटमध्येच विजयी सलामी दिली. पहिला सेट 7-5 ने खिशात घातला तर दुसर्‍या सेटमध्ये 2-6 अशी प्रार्थना मागे पडली. परंतु सुपर टायब्रेकमध्ये 10-04 असा विजय मिळवित सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi