Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निवृत्त होण्याचा विचार नाही - अभिनव बिंद्रा

निवृत्त होण्याचा विचार नाही - अभिनव बिंद्रा

वेबदुनिया

लंडन , मंगळवार, 31 जुलै 2012 (11:35 IST)
WD
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारा अभिनव बिंद्रा लंडन ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफलच्या स्पर्धेतून बाद झाला असला तरी, निवृत्त होण्याचा आपला कसलाही विचार नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

चार वर्षांपूर्वी बीजिंक ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतच सुवर्णपदक पटकावून ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले व्यक्तिगत सुवर्णपदक पटकावून देण्याची ऐतिहासिक कामगिरी कणार्‍या बिंद्राला सोमवारी लंडन ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअररायफलच्याच अंतिम फेरीतही प्रवेश करता आला नाही. पात्रता फेरीत 600पैकी 594 गुर पटकावून तो 16व्या स्थानी राहिला. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये या प्रकारात सलग दोन वेळा सुवर्णपदक पटकावण्याचा विश्वविक्रम करण्याची त्याची संधीही हुकली.

Share this Story:

Follow Webdunia marathi