Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिस्टोरियसच्या आगामी शर्यती रद्द!

पिस्टोरियसच्या आगामी शर्यती रद्द!

वेबदुनिया

WD
प्रेयसीच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असणारा अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियसच्या आगामी सर्व धावण्याच्या शर्टती (रेसेस) त्याच्या एजंटकडून रद्द करण्यात आल्या आहेत. 2016 रिओ ऑलिम्पिक आणि पॅरॉलिम्पिकच्या 'प्रमोशन'साठी पिस्टोरियसची पुढील महिन्यात अपंग धावपटू अ‍ॅलन ओलिविराविरुद्ध रेस ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी लंडन पॅरॉलिम्पिकमध्ये 200 मीटर रेसमध्ये पिस्टोरियसला नमवून ओलिविराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

त्याशिवाय 31 मार्चला रिओ दी जानेरो येतील कोपाकॅबॅना बीच येथे होणार्‍या रेसमधूनही पिस्टोरियसने माघारे घेतली आहे. पिस्टोरियसचे एजंट पीट वॉझिल यांनी ही माहिती दिली. पिस्टोरियसच्या रेसमधील सहभागाबाबत सध्या आपण काहीच सांगू शकत नाही, असेही वँझिल यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi