Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेनल्टी शूटआऊट म्हणजे जुगारच- मोरिन्हो

पेनल्टी शूटआऊट म्हणजे जुगारच- मोरिन्हो
लंडन , बुधवार, 11 जून 2014 (15:33 IST)
२0१४च्या फिफा विश्‍वचषकातील काही सामन्यांचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागण्याची शक्यता आहे. या पेनल्टी शूटआऊटवर कित्येक खेळाडूंचे आणि संघांचे भवितव्य ठरणार आहे. सामन्यात कोणत्याही संघाचा गोल न झाल्यास प्रत्येक संघाला पेनल्टी शूटआऊटची संधी मिळते; पण हे पेनल्टी शूटआऊट म्हणजे एक प्रकारे जुगारच आहे. त्यासाठी विशेष तयारी करणे निर्थक असल्याचे मत चेल्सीचे व्यवस्थापक जोस मोरिन्हो यांनी व्यक्त केले आहे. 

मोरिन्हो चेल्सीचे प्रशिक्षक असताना २00७ मधील चॅम्पियन्स लीगमधील उपांत्य फेरीत चेल्सीला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २0१२ मध्ये रियल माद्रिदला पराभवाचा सामना करावा लागला होता. 'पेनल्टीबाबत मला काही विचारू नका; कारण मी नेहमीच पेनल्टी शूटआऊट हरत आलो आहे,' असे मोरिन्हो म्हणाले. यंदाच्या विश्‍वचषकादरम्यान मोरिन्हो याहू या संकेतस्थळासाठी फुटबॉल विश्लेषक म्हणून काम पाहणार आहेत. 'प्रत्येक वेळी आम्ही पूर्ण तयारीनिशी मैदानावर उतरतो. तरीदेखील मी अनेकदा पेनल्टी शूटआऊट हरत आलो आहे.

मी याबाबत प्रतिस्पर्धी संघांचे विश्लेषणसुद्धा केले आहे.' मोरिन्हो म्हणाले, आम्हाला जे काही करता येणे शक्य होते ते आम्ही केले; पण वस्तुस्थिती ही आहे की पेनल्टी शूटआऊटसाठी विशेष तयारी करण्याची आवश्यकता नाही. पेनल्टी शूटआऊट म्हणजे लॉटरीच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi