Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेसचे दुहेरी विजेतेपदाचे अर्धशतक

पेसचे दुहेरी विजेतेपदाचे अर्धशतक

वेबदुनिया

मायामी , सोमवार, 2 एप्रिल 2012 (11:25 IST)
WD
भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएँडर पेस याने चेक प्रजासत्ताकचा साथीदार राडेक स्टेपानेकच्या साथीत मायामी टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. एटीपीच्या स्पर्धेतील पेसचे हे कारकिर्दीमधील दुहेरीचे पन्नासावे, मायामी स्पर्धेतील सलग तिसरे विजेतेपद ठरले.

पेस-स्टेपानेक जोडीला या वेळी सातवे मानांकन देण्यात आले होते. त्यांनी आणखी एक सनसनाटी निकाल नोंदविताना द्वितीय मानांकित मॅक्‍स मिर्नयी आणि डॅनिएल नेस्टर जोडीचा 3-6, 6-1, 10-8 असा पराभव केला.

पहिला सेट गमाविल्यानंतर पेस-स्टेपानेक जोडीने दुसऱ्या सेटमध्ये नेस्टर-मिर्नयी जोडीची सर्व्हिस दोनवेळा भेदत विजय मिळविला आणि लढत टायब्रेकरमध्ये नेली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये पेस-स्टेपानेक एकवेळा 1-4 असे पिछाडीवर होते. त्यानंतर त्यांनी सलग सहा गुण घेत आघाडी मिळविली. त्यानंतर स्टेपानेकच्या सुरेख व्हॉलीने त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ही लढत 82 मिनिटे चालली.

Share this Story:

Follow Webdunia marathi