Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रो कबड्डी: अभिषेकची 'गुलाबी गँग'बनली चॅम्पियन

प्रो कबड्डी: अभिषेकची 'गुलाबी गँग'बनली चॅम्पियन
मुंबई , सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (10:26 IST)
'यु मुंबा'ला नमवून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या 'जयपूर पिंक पँथर्स'ने पहिल्याबहिल्या प्रो कबड्डी लीगच्या जेतेपदाला गवसणी घशतली. जयपूर पिंक पँथर्सने साखळी फेरीतील आठ शहरांमध्ये राखलेला विजयी अश्वमेध रविवारी मुंबईतसुद्धा कायम राखला.जयपूरने यजमान यु मुंबाचा 35-24 असा धुव्वा उडवून पहिल्या चषकावर नाव कोरले. जयपूर पिंक पँथर्सच्या विजयाची घोषणा होताच संघमालक अभिषेक बच्चन, पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन हे दोघे जयपूरच्या विजयीत सहभागी झाले. 
 
प्रशांत चव्हाण हा जयपूर संघांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मूळ लिलावात समावेश नसलेल्या प्रशांतला खरे तर जयपूरच्या संघात प्रो-कबड्डी सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली.  अखेर महाराष्ट्राच्या या सुपुत्राने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. 
       
स्पर्धेचे मानकरी पुढीलप्रमाणे...
सर्वोत्तम चढाईपटू : राहुल चौधरी (तेलुगू टायटन्स)
सर्वोत्तम पकडपटू : मनजीत चिल्लर (बंगळुरू बुल्स)
सर्वात मौल्यवान खेळाडू : अनुप कुमार (यु मुंबा)

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi