Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रो कबड्डी लीगमध्ये 'फिक्सिंग'

प्रो कबड्डी लीगमध्ये 'फिक्सिंग'
नाशिक , सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (10:49 IST)
नुकत्याच झालेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये अनेक सामन्यांचे फिक्सिंग झाले असून या लीगचा अंतिम विजेता जयपूरचा पिंक पॅँथरचठरेल, असा माझा आरोप सिद्ध झाला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी आपण केलेले आरोप १०० टक्के खरे ठरले असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलानांना केला आहे.
 
प्रो लीग कबड्डीतील काही सामने आधीपासूनच निश्चित झाले होते. विशेष म्हणजे आपण ते निदर्शनासही आणून दिल्याचे पाथ्रीकर यांनी दोन ऑगस्टला नाशिक दौऱ्यावर असताना केला होता.
 
जयपूरचा संघ कबड्डीचे राष्ट्रीय अध्यक्ष जनार्दन गेहलोत यांच्या राज्यातील आहे. तसेच या पिंक पॅँथर्सला बच्चन कुटुंबीयाने विकत घेतले आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबीयांतील अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चनच्या प्रेक्षागृहातील उपस्थितीनेदेखील प्रो लीग कबड्डीचे वलय वाढत असल्याचा दुहेरी फायदा लक्षात घेऊनच ही चाल खेळण्यात आली असल्याचा आरोपदेखील पाथ्रीकर यांनी केला आहे. 

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi