Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फुटबॉलचा महासंग्राम सुरू

फुटबॉलचा महासंग्राम सुरू
साओ पावलो, ब्राझिल , शुक्रवार, 13 जून 2014 (10:36 IST)
ब्राझिलच संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या रंगारंग कार्यक्रमाने गुरुवारी रात्री फुटबॉल वर्ल्डकपचे शानदार उद्घाटन झाले.

प्रख्यात अभिनेत्री व पॉपस्टार जेनिफर लोपेझ, रॅपर पिटबुल व ब्राझिलची गायिका क्वाडिया लिटे यांच्या गायन व नृत्यविष्कारावर सारे जग डोलू लागले आणि हीच लय, हाच ताल आता 13 जुलैपर्यंत कायम राहणार आहे. क्रीडा विश्वाला ठेका धराला लावणार्‍या ‘वुई आर वन.. ओले, ओले, ओले, ओला’ या गीताने विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन झाले. लोपेझच्या मादक अदांवर घाळ होत अरेना कोरिन्थिास स्टेडियममधील 60 हजारांवर फु टबॉलप्रेमी थिरकत होते. स्टेडियम आणि परिसरात ब्राझिलची पिवळी जर्सी घातलेले हजारो पाठीराखे डोलत होते, गात होते अन् जल्लोष करीत स्वत:चच रंगविलेल्या चेहर्‍यांची सेलवर छाचित्रेही काढत होते. ‘सांबा’च्या तालावर जवळपास 600 कलाकार थिरकत होते तो क्षण जगभरातील 100 कोटींपेक्षा अधिक फुटबॉलप्रेमींनी आपापल्या देशात दूरचित्रवाणीवरून पाहिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi