Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्रेंच खुले टेनिस; अँडी मरे स्पर्धेबाहेर

फ्रेंच खुले टेनिस; अँडी मरे स्पर्धेबाहेर

वेबदुनिया

PR
ब्रिटनचा अव्वल टेनिसपटू अँडी मरे याने पाठीच्या दुखण्यामुळे फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. वैद्यकीय विशेषतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे पॅरीसमध्ये खेळू शकत नाही याबद्दल मला खेद वाटत आहे, असेही त्याने सांगितले. माझी इच्छा नसतानाही मला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. आता मी ग्रासकोर्ट स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. मला वेदना होत असून त्या बंद होणे गरजेचे आहे. रोम मास्टर्स स्पर्धेतून दुसर्‍या फेरीत पाठदुखीमुळे मला माघार घ्यवी लागली याची आठवणही त्याने करुन दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi