Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्राझीलचा सुपडा साफ; जर्मनी फायनलमध्ये

ब्राझीलचा सुपडा साफ; जर्मनी फायनलमध्ये
बेलो हॉरिजोंटे , बुधवार, 9 जुलै 2014 (10:13 IST)
'फिफा' विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जर्मनीने ब्राझीलला 7-1 ने पराभूत करत फायनलमध्ये धडक दिली आहे. जर्मनीने स्पर्धेतून ब्राझीलचा सुपडाच साफ करून टाकल आहे. ब्राझील संघाला तब्बल 39 वर्षांनंतर प्रथमच घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला.

जर्ममनीच्या खेळाडूंनी सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये अवघ्या सहा मिनिटांतच चार गोल करून विक्रम प्रस्थापित केला. फायनलमध्ये आता जर्मनीची लढत अज्रेंटिना आणि हॉलंड सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल.

सामन्याच्या 11 व्या मिनिटाला स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या थॉमस मुलरने शानदार गोल करत जर्मनीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीमुळे जर्मनी खेळाडूंत एकप्रकारची अलौकिक शक्तीच संचारल्यासारखे झाले. तेविसाव्या मिनिटाला मिरास्लोव्ह क्लोजने शानदार गोल करत आघाडी 2-0 वर नेऊन पोहोचवली. त्यानंतर मैदानातील आणि टीव्हीसमोरील प्रेक्षकांच्या डोळयांचे पाते लवते न लवते तोच जर्ममनीच्या टोनी क्रुसने 24 व्या आणि 26 व्या मिनिटाला लागोपाठ गोल करून सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडले. त्यानंतर 29 व्या मिनिटाला सॅमी खेदीराने आणखी एक गोल करत विश्वचषकातील वेगवान गोलचा विक्रम केला. दुसर्‍या हाफमध्येही जर्मनीने आपला दबदबा कायम ठेवला.
सामन्याच्या 69 आणि 79 व्या मिनिटाला स्कर्लेने एकापाठोपाठ एक गोल करत जर्मनीला 7-0 वर नेऊन पोहोचवले. 90 मिनिटाला ऑस्करने ब्राझीलकडून एकमेव गोल केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi