Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारत-पाकिस्तान हॉकी मालिका रद्द

भारत-पाकिस्तान हॉकी मालिका रद्द

वेबदुनिया

WD
अफजल गुरूस फासावर लटकावल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने संसदेत प्रस्ताव मंजूर केल्यानंतर भारत सरकारने पाकला मर्यादेत राहण्याचा दम भरतानाच दोन देशांदरम्यान एप्रिलमध्ये होणारी हॉकी मालिका रद्द केली आहे.

या मुद्यावर विरोधी पक्ष भाजपने संसदेत कडक धोरण अवलंबवताना चर्चेची मागणी केली. पाकिस्तानने अफजल गुरूच्या फाशीवर त्यांच्या संसदेत प्रस्ताव मंजूर करणे अस्विकार्य असून पाकविरूद्ध आपण प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केली. या मुद्यावरून पाकचे धोरण स्पष्ट झाले असून भारताने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे, असे अरूण जेटली म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi