Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेक्सिकोची कॅमेरुनवर 1-0 ने मात

मेक्सिकोची कॅमेरुनवर 1-0 ने मात
ब्राझील , शनिवार, 14 जून 2014 (11:13 IST)
स्टेडिओ दास दुनास या मैदानावर शुक्रवारी झालेल्या अ गटातील दुसर्‍या  सामन्यात मेक्सिकोनने कॅमेरुनचा एकमेव गोलने पराभव केला.

मेक्सिकोचा हा फुटबॉल विश्वचषकातील एखाद्या आफ्रिकन संघाविरुध्दचा पहिलाच विजय आहे. मेक्सिकोचा ओरिबे पेराल्टा याने 61 व्या मिनिटाला केलेल्या मैदानी गोलमुळे हा विजय मिळाला. पूर्वार्धात एकही गोल न झाल्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली होती. पहिल्या किकपासून सातत्याने कोसळणार्‍या पावसात हा सामना खेळला गेला. त्यामुळे सामन्याचा वेग काहिसा मंदावला होता. 57 व मिनिटाला हेक्टर मोरेना याला पिवळे कार्ड दाखविण्यात आले. कॅमेरुनचा नंबर 5 चा खेळाडू नो ऊनके ओऊ यालाही पिवळे कार्ड दाखविण्यात आले. 61 व्या मिनिटाला मॅक्सिकोच्या दहा नंबरचा जर्सी घालणार्‍या   खेळाडूने अत्यंत आक्रमकपणे मारलेला फटका कॅमेरुनच्या गोलरक्षकाने अडवला. मात्र लगेचच ओरिबे पेराल्टा या मेक्सिकोच्या 19 क्रमांकाचा जर्सी घालणार्‍या आघाडी फळीतील खेळाडूने लपोस्टच अत्यंत जवळून मारलेला फटका थेट गोल पोस्टमध्ये गेल्यामुळे मेक्सिकोच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. पावसाचा अंदाज असल्याने प्रेक्षकही पूर्ण तारीनिशी स्टेडिमध्ये दाखल झाले होते. 61व्या मिनिटाला गोल झाल्यानंतर मेक्सिकन खेळाडूंनी लांब अंतरावरील पासेस देत वेळकाढूपणा केला. पूर्वार्धात 2.02 मिनिटांचा स्टॉपेज टाइम होता तर उत्तरार्धात 4 मिनिटांचा स्टापेज टाइम होता. मात्र, कॅमेरुनला खेळाडूंमध्ये शेवटच्या क्षणार्पत बदल करूनही गोल करता आला नाही.

मेक्सिको कॅमेरुन

3 शॉटस् अँट गोल 5

1 शॉटस् ऑन टार्गेट 0

6 फाऊल 6

2 कॉर्नर्स  3

5 ऑफसाईड 2

Share this Story:

Follow Webdunia marathi