Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेसीसाठी गर्लफ्रेंड एंटोनेला ठरली ‘लकी’

मेसीसाठी गर्लफ्रेंड एंटोनेला ठरली ‘लकी’
, शुक्रवार, 11 जुलै 2014 (14:29 IST)
अर्जेटिनाचा कर्णधार आणि गोल्डन बुटाचा मानकरी लियोनेल मेसीसाठी गर्लफ्रेंड एंटोनेला ‘लकी’ ठरली आहे. या विश्वचषकामध्ये एंटोनेला मेसीचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचली होती. तिने अर्जेटिना संघाला चिअरअप केले होते.

सेमीफायनलमध्ये झालेल्या सामन्यामध्ये अर्जेटिनाने नेदरलँडला 4-2 ने पराभूत केले. अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सेमीफायनलमध्ये अर्जेटिनाने नेदरलँडला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले. सामन्यातील क्षणागणिक एंटोनेलाच्या चेहर्‍यावर भाव तरळत होते.

बॉल नेदरलँडच्या मैदानात गेला की एंटोनेलाच्या चेहर्‍यावर हास्य तरळत होते तर अर्जेटिनाच्या मैदानात असला त्यावेळी ती चिंतेत दिसत होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi