Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युरो-2012चा चँपियन बनला स्पेन!

युरो-2012चा चँपियन बनला स्पेन!

वेबदुनिया

किव , सोमवार, 2 जुलै 2012 (11:51 IST)
PR
युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत इटलीचे ४-०ने पराभव करत स्पेनने २०१२चा युरो चषक जिंकला. २००८ चा युरो कप, २०१०चा वर्ल्डकप आणि यावेळी पुन्हा युरोकपचे विजेतेपद पटकवणा-या स्पेनने फुटबॉलमध्ये एक नवा इतिहास रचला. हजारो चाहत्यांच्या उपस्थितीने स्थानिक ऑलिम्पिक स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात स्पेनने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून इटलीला मागे ठेवले.

सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या १४ व्या मिनिटाला डेव्हिड सिल्व्हाने पहिला गोल करत १-० अशा महत्वाची आघाडी घेतली. ४१ व्या मिनिटाला स्पेनच्या जॉर्डी अल्बाने फिल्ड गोल करून २-० ने आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर स्पेनच्या खेळाडूंत वेगळाच उत्साह संचारला. पहिल्या हाफमध्ये स्पेनने 2-0 ने आघाडी घेतली.

तर दुस-या हाफमध्ये स्पेनच्या ८४व्या मिनिटाला फर्नांडो टोरेसने गोल केला. यानंतर अवघ्या चार मिनिटांनंतर माटाने इटलीच्या चार खेळाडूंना चकवत सोपा गोल करून संघाची आघाडी ४-० अशी केली. स्पेनने धडाकेबाज खेळ करत इटलीला डोके वर काढण्याची एकही संधी दिली नाही. स्पेनच्या गतविजेत्या संघातील १४ खेळाडूंपैकी ९ खेळाडू सध्याच्या संघात कायम होते. या अनुभवाचा फायदा उठवत स्पेनने विजयी घोडदौड कायम ठेवली.

Share this Story:

Follow Webdunia marathi