Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

योगेश्वरचा ब्रॉन्ज मेडल सिल्वरमध्ये बदलेल

योगेश्वरचा ब्रॉन्ज मेडल सिल्वरमध्ये बदलेल
नवी दिल्ली/पानिपत , मंगळवार, 30 ऑगस्ट 2016 (13:13 IST)
4 वर्ष आधी ऑलिंपिकमध्ये रशियाच्या ज्या रेसलर समोर हरला, तो डोपिंगचा दोषी निघाला  
योगेश्वर दत्तने लंडन ऑलिंपिकमध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकले होते, पण चार वर्षांनंतर त्याचा रंग बदलणार आहे. असे लंडन ऑलिंपिकचे  सिल्वर मेडलिस्ट बेसिक कुदुखोवचे डोपिंगचे दोषी असल्यामुळे होणार आहे. कुदुखोवचा मेडल त्याच्याकडून घेतला जाणार आहे, जे आता  योगेश्वरला मिळेल. कुदुखोवने प्री-क्वार्टर फायनलमध्ये योगेश्वरचे पराभव केले होते. सिल्वर मेडल जिंकणारे दुसरे रेसलर बनले योगेश्वर...
 
- 2012 ऑलिंपिकचा सिल्वर मेडल मिळाल्याबरोबरच योगेश्वर दत्त हे मेडल मिळवणारा दुसरा पैलवान होईल.   
- 2012 ऑलिंपिकमध्ये सुशील कुमाराने 66 किलोग्रॅम वर्गात कुश्तीचा सिल्वर मेडल जिंकला होता.  
 
योगेश्वरने जिंकला होता ब्रॉन्ज मेडल
- 2012च्या ऑलिंपिकमध्ये 60 किलोग्रॅम वर्गात ब्रॉन्ज मेडलसाठी झालेल्या सामन्यात योगेश्वर दत्तने उत्तर कोरियाच्या री जोंग मयूंगचा पराभव केला होता.  
- प्री-क्वार्टर फायनलमध्ये योगेश्वर दत्त रूसी पैलवान कुदुखोवकडून पराभूत झाला होता.  
- कुदुखोवच्या फायनलमध्ये पोहोचल्यामुळे भारतीय पैलवानाला रेपेचेजच्या माध्यमाने एक अजून मोका मिळाला. नंतर योगेश्वरने रेपचेज राउंडच्या माध्यमाने ब्रॉन्ज मेडल जिंकला.  
- रेपेचेज 2 फायनलिस्टमध्ये राउंड-16, क्वार्टर आणि सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या रेसलर्सला ब्रॉन्ज जिंकण्याची संधी देतो.  
- दोन्ही फायनलिस्टशी पराभूत झालेल्या रेसलर्सच्या मध्ये सामन्यानंतर दोन विनर्सला ब्रॉन्ज देण्यात येतो.  
 
रूसी पैलवान डोपिंगचा दोषी, मेडल परत घेतले  
- सिल्वर मेडल जिंकणारे रूसी पैलवान बेसिक कुदुखोववर करण्यात आलेल्या डोपिंग टेस्ट पॉझिटिव्ह मिळाला आहे, ज्यानंतर त्याचा  सिल्वर मेडल परत घेण्यात आले आहे.   
- हे सिल्वर मेडल आता भारतीय पैलवान योगेश्वर दत्तला देण्यात येईल, या बातमीची पुष्टी यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंगच्या सूत्रांनी दिली आहे.  
- चार बार वर्ल्ड चॅम्पियन राहून चुकले रूसी पैलवान बेसिक कुदुखोवचा मृत्यू 2013मध्ये एका कार अपघातात झाला होता.  
- रियो ऑलिंपिक सुरू होण्याच्या अगोदर इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीने लंडन ऑलिंपिकदरम्यान घेण्यात आलेल्या पैलवान बेसिक कुदुखोवच्या सेम्पलवर परत एकदा डोप टेस्ट केला, ज्यात तो दोषी आढळून आला आहे. - आर्बिट्रेशन कोर्ट (केस)ने निर्णय सुरक्षित ठेवला होता. रियो ऑलिंपिकमुळे त्या वेळेस निर्णय देण्यात आला नाही.  
- रियो ऑलिंपिक 2016मध्ये 65 किलोग्राम फ्री-स्टाइल कुश्तीत खेळताना योगेश्वर दत्त फर्स्ट राउंडामध्ये बाहेर झाला होता.  
- योगेश्वरला मंगोलियाचे पैलवान मन्दाखनारन गँजोरिगने 3-0ने पराभूत केले होते. 
- मन्दाखनारनचे आपल्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे योगेश्वरला रेपचेजमध्ये खेळण्याचा मोका मिळाला नाही आणि त्याला बगैर मेडलचे परत यावे लागले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पी.वी. सिंधू बनेल CRPF कमांडंट आणि ब्रँड अॅम्बेसेडर