Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजेंदरचा 'नॉक आऊट' पंच

विजेंदरचा 'नॉक आऊट' पंच
डबलिन , सोमवार, 9 नोव्हेंबर 2015 (08:25 IST)
भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंगने आपल्या दुसर्‍या व्यावसायिक लढतीत डील गिलेनला पहिल्या फेरीत नॉक आऊट पंच ठोकून दणदणीत विजय साजरा केला. तीन मिनिटांच्या या फेरीत विजेंदरने इतके जबरदस्त ठोसे मारले की ब्रिटनचा प्रतिस्पर्धी बॉक्सर दोनदा कोलमडून पडला. व्यावसायिक बॉक्सिंगमधील आपल्या पहिल्या लढतीत विजेंदरने सोनी विटिंगला तीन फेर्‍यात गारद केले होते. मात्र, दुसर्‍या विजयासाठी त्याला तीन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi