Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजेंदरने केले लग्नाच्या वृत्ताचे खंडन

विजेंदरने केले लग्नाच्या वृत्ताचे खंडन
स्टार मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह याने विवाहबद्ध होणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. विजेंदर सद्या ऑस्ट्रेलियात डार्विन येथे एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेलेला आहे.

त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना लग्नाच्या अफवेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. एक दिवस लग्न करायचेच आहे मात्र सद्या आपण विवाहबद्ध होणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

काही वृत्तपत्रात विजेंदर ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर येत्या सतरा मे रोजी दिल्लीतील मुलीसोबत आपल्या कालुवास गावी विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi