Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विम्बल्डनपूर्वी तंदुरुस्त होणार -अँडी मरे

विम्बल्डनपूर्वी तंदुरुस्त होणार -अँडी मरे

वेबदुनिया

WD
ब्रिटनचा स्टार टेनिसपटू अँडी मरे याने विम्बल्डन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त होऊ, अशी आशा व्यक्त केली आहे.

सध्या तो पाठदुखीमुळे विश्रंती घेत आहे. या दुखापतीमुळे त्या यावर्षीच्या पहिल्या ग्रँडस्लॅम फ्रेच खुल्या स्पर्धेत भाग घेता आला नाही. अँडी मरे हा पाठदुखीवर उपचार करून घेत असून त्यात सुधारणा घडत आहे. जगात दुसर्‍या स्थानांवर असलेल्या मरे हा या दुखापतीशी संघर्ष करीत आहे. ही दुखापत बरी होण्यास बराच अवधी आहे, अशी कबुलीही त्याने दिली. गवताचे ग्रासकोर्ट हे क्ले कोर्टपेक्षा खेळण्यास सोपे असते आणि विम्बल्डनचे कोर्ट हे खेळण्यास सुरेख राहील. या स्पर्धेसाठी क्वीन्स ओव्हलवर सराव सामने खेळले जातील. या सामन्यात भाग घेऊन तयारी करण्याची माझी इच्छा आहे असे तो म्हणाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi