Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्वचषक फुटबॉल; सुवारेजवर लक्ष

विश्वचषक फुटबॉल; सुवारेजवर लक्ष
ब्रासीलिया , बुधवार, 11 जून 2014 (15:07 IST)
लिव्हरपूलकडून खेळणारा लुईस सुवारेज याला हा फुटबॉल हंगाम प्रदर्शनी ठरला. इंग्लिश फुटबॉल शौकिनांमध्ये आपली प्रतिमा पुन्हा उंचावण्याची त्याने कामगिरी केली. परंतु आता तो ब्राझीलमध्ये खेळल्या जाणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सर्वाचे लक्ष केंद्रित करणारा ठरला आहे.

उरुग्वेकडून तो या स्पर्धेत खेळाणार आहे आणि विश्चषकातील ‘ड’ गटात उरुग्वेचा संघ आहे. त्यामुळे तो आता शत्रू क्रमांक 1 ठरला आहे. या गटात इंग्लंड आणि इटली हे संघसुद्धा आहेत. उरुग्वेसह हे तिन्ही संघ माजी विश्वविजेते आहेत. चौथा संघ कोस्टारिकाचा आहे आणि या संघातसुद्धा कुशल असे खेळाडू मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे या गटातील प्रत्येक सामना हा खडतर असा ठरणार आहे आणि कुणालाही अंदाज बांधता येणार नाही.

सुवारेजची तंदुरुस्ती किती आहे हे कळाल्यानंतरच त्याच्या खेळाबाबत अंदाज बांधता येईल. सुवारेजने 22 मे रोजी त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्याच्या खेळावरच बरेचशे अवलंबून राहणार आहे. 2010 साली उरुग्वेने या स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली होती. त्यामुळे सुवारेजची प्रगती ही महत्त्वाची ठरणार आहे. तो आणि दिएगो फोरलन या दोघांवर आक्रमणाची जबाबदारी राहील. सुवारेजने या हंगामात 31 साखळी गोल केले आहेत. त्याचप्रमाणे त्याने पात्रता फेरीच मोहिमेत उरुग्वेसाठी 11 गोल केले आहेत. कोस्टारिकाविरुद्ध शनिवारी खेळल्या जाणार्‍या सामन्यास तो मुकण्याची शक्यता आहे. परंतु तो 19 रोजी सावोपावलो येथे होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

फोरलन आणि एडिनसन कवानी हे दोघे जबरदस्त खेळाडू असून त्यांचे आक्रमण आम्हाला पुरेसे होईल. कोस्टारिकाविरुद्ध विजयाने सुरुवात करू, असे उरुग्वेचे प्रशिक्षक ऑस्कर टाबारेज यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi