Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शूमाकर लढवय्या आहे

सहजासहजी हार पत्करणार नाही!

शूमाकर लढवय्या आहे

वेबदुनिया

WD
आल्प्स शिखरावर स्किईंग करताना अपघात झाल्यामुळे सध्या मृत्यूशी झुंज देत असणारा मायकल शूमाकर हा लढवय्या असून सहजासहजी तो मृत्यूला जवळ येऊ देणार नाही, असे त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

येथील ग्रेनोबल इस्पितळात उपचार घेत असलेल्या मायकेल शूमाकरने पंचेचाळिसाव्या वर्षात पदार्पण केले. अपघात झाल्यानंतर जेव्हा शूमाकरला इस्पितळात दाखल करण्यात आले तेव्हा पासून तो कोमात आहे. शस्त्रक्रिया होऊनही डॉक्टर्सनी त्याची तब्येत चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.

सात वेळा प्रतिष्ठेच्या 'फॉर्म्युला वन' स्पध्रेचे विजेतेपद पटकावणार्‍या शूमाकरने ४५व्या वर्षात पदार्पण केल्यावर त्याच्या कुटुंबीयांकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात म्हटले आहे की आम्हाला सर्वांना ठाऊक आहे की मायकल हा एक लढवय्या असून तो सहजासहजी हार पत्करणार नाही. या पत्रकाद्वारे शूमाकर कुटुंबीयांनी मायकलच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्याबद्दल आभार मानले आहेत. गुरुवारी शूमाकरवर उपचार करणार्‍या डॉक्टर्सनी आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या तब्येतीविषयी कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, 'फॉर्म्युला वन' स्पध्रेतील फेरारी संघाने ग्रेनोबल इस्पितळाबाहेर शांतता मेळाव्याचे आयोजन केले आहे. याच फेरारी संघातर्फे खेळताना मायकेल शूमाकरने ७ वेळा 'फॉर्म्युला वन' स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. सरकारी वकिलांनी मायकेल शूमाकरला झालेल्या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. फ्रान्समध्ये क ोणत्याही अपघाताची चौकशी केली जाते. अपघात झाला तेव्हा मायकेल शूमाकर किती वेगाने स्किईंग करत होता, याचा ते शोध घेत आहेत.

१९९१ साली 'फॉर्म्युला वन'मध्ये पदार्पण केलेल्या शूमाकरने या स्पर्धेची सर्वाधिक विजेतेपदे पटकावण्याचा पराक्रम केला आहे. कोणत्याही ड्रायव्हरपेक्षा तो अधिक वेळा 'फ ॉर्म्युला वन'मध्ये सहभागी झाला आहे. ३७व्या वर्षी तो प्रथम नवृत्त झाला. २0१0 साली तो पुन्हा 'फॉर्म्युला वन'मध्ये दाखल झाला; परंतु पूर्वीसारखे त्याला यश मिळाले नाही म्हणून त्याने २0१२ साली पुन्हा नवृत्ती स्वीकारली. 'फॉर्म्युला वन'मध्ये सर्वात अधिक धोके पत्करणारा ड्रायव्हर म्हणूनही तो प्रसिद्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi