Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सानिया-कॅरा ब्लॅक अंतिम फेरीत

सानिया-कॅरा ब्लॅक अंतिम फेरीत

वेबदुनिया

WD
सानिया मिर्झा- कॅरा ब्लॅक जोडीने चाना ओपन स्पर्धेत महिला दुहेरीत सारा इराणी- रॉबेर्टा व्हिन्सी या अग्रक्रमी जोडीला तडावा देत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष विभागात पेस- नेस्टोर जोडीने उपान्त्य फेरीत प्रवेश केला. पुरुष विभागात पेस- नेस्टोर जोडीने उपान्त्य फेरी गाठली. एकेरीत रॅफेल नदालने नंबर वन पद मिळवण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.

स्पॅनीश नंबर टू उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात थरारक विजय मिळवत नंबर वन नोवाक जोकोविचला गॅसवर ठेवले. फॅबिओ फोगनिनीने पहिला सेट जिंकून दुस-या सेटमध्ये ४-१ अशी आघाडी मारली होती. परंतु नदालने जिद्द कायम ठेवत सातव्या गेममध्ये ईटलीच्या फोगनिनीची सव्र्हिस तोडली आणि नंतरचे तीन गेम जिंकत दुसरा सेट ६-४ असा जिंकला.
जागतिक क्रमवारीत फोगनिनी १९ क्रमांकावर आहे. त्याने पहिला सेट जिंकला होता. परंतु नदालने नंतरचे दोन गेम जिंकत उपान्त्य फेरीत प्रवेश केला.नोवाकला पराभूत करून त्यांच्याकडून नंबरवन पद हिसकावण्याचा नदालचा प्रयत्न आहे. चायना ओपन स्पर्धेत नोवाकने जेतेपद मिळवले आणि नदालला उपान्त्य फेरी जिंकता न आल्यास नंबर वन पद नोवाककडेच राहील. उपान्त्य फेरीत नदालची गाठ अमेरिकेच्या जॉन इस्नेर अथवा झेकचा चौथा सीड टॉमस बेर्डीच विरूद्ध पडेल. यंदाच्या हंगामात नदालने हार्डकोर्टवरील एकही सामना गमावलेला नाही.

पेस-नेस्टोर उपान्त्य फेरीत :
पुरुष दुहेरीत लियांडर पेस (भारत) आणि डॅनिएल नेस्टोर (कॅनडा) जोडीने निकराची झुंज देत उपान्त्यपूर्व फेरीचा सामना जिंकला. पेस- नेस्टोर जोडीने ऑगस्टमध्ये विन्स्टन-सालेम स्पर्धा जिंकली होती. काल या जोडीने स्पेनच्या डेव्हीड मारेरो- फर्नांडो वेर्डास्को जोडीवर ७-६, ६-३ अशी मात केली. भारत- कॅनडा या टॉप जोडीचा उपान्त्य फेरीत ईटलीच्या फॅबियो फोगनिनी- आन्द्रेस सेपीविरूद्ध सामना होईल.

सानिया- ब्लॅकची भरारी :
महिला विभागात सानिया- कॅरा ब्लॅक जोडीने ईटलीची टॉप जोडी सारा इरानी- रॉबेर्टा व्हिन्सी जोडीला पराभवाचा तडाखा देऊन अंतिम फेरीत प्रवेश केला. सानिया- ब्लॅकचा हा सलग आठवा विजय. सानिया- ब्लॅक (झिम्बाब्वे) जोडीने या आधी टोकियो स्पर्धा जिंकली होती. बीजिंग स्पर्धेत या जोडीने अग्रक्रमी जोडीचे आव्हान ६-४, ६-४ असे ७२ मिनिटात संपुष्टात आणले.

सानियाने या हंगामात प्रारंभी बेथानी-मॅटेक सॅन्डस् या अमेरिकन खेळाडूबरोबर जोडी जमवली होती. अध्र्या हंगामानंतर तिने लिझेल ह्यूबर (अमेरिका), फ्लाविआ पेनेटा (इटली) आणि चीनच्या जी झेंगबरोबर जोडी जमवली होती. आता ती कॅरासमवेत खेळत आहे. सानियाने झेंग समवेत अमेरिकन ओपनची उपान्त्य फेरी गाठली होती आणि कॅरासमवेत टोकियो ओपन स्पर्धा जिंकली होती. बेथानी- मॅटेक समवेत तिने दुबई आणि ब्रिस्बेन स्पर्धा जिंकल्या. आता तिला पाचवे जेतेपद मिळवण्याची संधी आहे. कालच्या सामन्यात दुस-या सेटमध्ये सानिया- कॅराने चार पैकी तीन ब्रेक्सचा फायदा उठवला. अंतिम फेरीत त्यांचा सामना चीनच्या सू-वी-शुआई पेंग अथवा वेरा दुशेविना (रशिया)- अ‍ॅरांझा संतोजा (स्पेन) विरूद्ध होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi