Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सायनाची आगेकूच

सायनाची आगेकूच

वेबदुनिया

चीन , शुक्रवार, 16 डिसेंबर 2011 (17:52 IST)
भारताची बॅडमिंटन सुपरस्टार सायना नेहवालने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड सुपरसिरीज फायनल्सच्या दुसर्‍या फेरीत विजयी आगेकूच केली. तिने जपानच्या सयाका सातो हिच्यावर २१-१६, २१-१३ ने मात केली.

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सायनाने ३७ मिनिटांत सातो हिला गुडघे टेकायला भाग पाडले. या विजयासह सायनाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याचा आपला दावा मजबूत केला आहे. पहिल्या गेममध्ये सातो एकवेळ १२-७ने आघाडीवर होती. त्या वेळी सातो हा गेम सहज जिंकणार, असे वाटत होते. मात्र, सायनाने निग्रहाने खेळ करीत सलग ५ गुण मिळवले व १२-१२ अशी बरोबरी साधली. सायनाने १६-१४ अशी आघाडी घेतल्यानंतर सातोने सलग २ गुण घेत १६-१६ अशी बरोबरी साधली. सायनाने ५ गुण घेत हा गेम २१-१६ने आपल्या नावे केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi