Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सायनाचे लक्ष चायना ओपनकडे

सायनाचे लक्ष चायना ओपनकडे
, मंगळवार, 10 नोव्हेंबर 2015 (10:06 IST)
फुजोऊ: स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचे लक्ष आगामी चायना ओपनवर असणार आहे़. सायनाने पोटाच्या दुखापतीमुळे जपान, डेन्मार्क आणि फ्रान्स ओपन स्पर्धेतून माघार घेतली होती़ मात्र आता प्रकृतीत सुधारणा झाली असून कामगिरी दाखविण्यासाठी उत्सुक असल्याचे सायना म्हणाली़. 
 
पहिल्या फेरीत सायनचा सामना चीनच्या की सून यू बरोबर होईल़ तिच्याविरुद्ध सायनाचे पारडे जड आहे़.  याशिवाय श्रीकांत, पी़व्ही़सिंधू, एच़एस़ प्रणय आणि अजय जयराम आणि दुहेरीत ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा या स्पर्धेत खेळणार आहे़.

Share this Story:

Follow Webdunia marathi