Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंधु, प्रणॉय, प्रणित तिसर्‍या फेरीत

सिंधु, प्रणॉय, प्रणित तिसर्‍या फेरीत
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (10:09 IST)
मकाव- येथे सुरू असलेल्या 120,000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या मकाव खुल्या ग्रां. प्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधु, तसेच प्रणॉय आणि प्रणित यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. मात्र अजय जयरामचे आव्हान संपुष्टात आले. महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीतील सामन्यात पी. व्ही. सिंधुने कोरियाच्या मिनचा 21- 13, 22-20 असा पराभव केला.

पुरूष एकेरीत प्रणॉयने चीन तैपेईच्या हेसनचा 21-19, 21-15, साई प्रणितने उझबेकच्या सॅव्हेटयुगनेचा 21-11, 21-8 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Share this Story:

Follow Webdunia marathi