Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेरेना चौथ्या फेरीत, व्हिनस बाहेर

सेरेना चौथ्या फेरीत, व्हिनस बाहेर

वेबदुनिया

WD
जपानच्या अयुमी मोरिताला 6-3, 6-3 असे सहज पराभूत करून सेरेना विल्यम्सने मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत प्रवेश केला. मात्र सेरेनाची बहीण व्हिनसला पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. सेरेनासाठी ही मॅच अविस्मरणीय ठरली. ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याने मॅचच्या स्थळी पोहोचण्यासाठी सेरेनाला चक्क एका मोटारसायकलचा आधार घ्यावा लागला. सुमारे एक तास ती ट्रॅफिकमध्ये अडकली होती. अखेर संयोजकांनी तिला मोटारसायकल दिली. तीन वेळा या स्पर्धेची चॅम्पियन व्हिनसला ‍मात्र तिसर्‍या फेरीतूनच माघार घ्यावी लागली. याशिवाय पोलंडच्या अग्नीस्का रंदावस्कानेही चौथी फेरी गाठली.

Share this Story:

Follow Webdunia marathi