Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेरेना, नदाल, जोकोविच विजयी!

सेरेना, नदाल, जोकोविच विजयी!

वेबदुनिया

न्यूयॉर्क , गुरूवार, 1 सप्टेंबर 2011 (12:58 IST)
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत रॅफेल नदाल, सेरेना विल्यम्स, नोव्हाक जोकोविच या प्रमुख खेळाडूंनी पहिल्या फेरीत विजय मिळविला. फ्रेंच विजेत्या ली ना हिचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

नदालने कझाकस्तानच्या आंद्रे गोलुबेवला तीन सेटमध्ये हरविले. दुसऱ्या सेटमध्ये नदालला सात सेटपॉइंट वाचवावे लागले. नदालचा खेळ नेहमीसारखा धडाकेबाज झाला नाही; पण मोक्‍याचे गुण त्याने जिंकले. शेवटचे सलग पाच गेम जिंकत त्याने विजय साकार केला. गोलुबेवने बेसलाइनच्या आतून खेळत कोर्टलगत दोन्ही बाजूंना जोरदार फटके मारले. त्याने "ड्रॉप शॉट'चाही वापर केला. दुसऱ्या सेटमध्ये नदालने 23-5 अशी पिछाडी भरून काढताना टायब्रेक एकाच गुणाच्या मोबदल्यात जिंकला. जोकोविचला आयर्लंडचा प्रतिस्पर्धी कॉनर निलॅंडने आजारपणामुळे पुढे चाल दिली. कॉनरला अन्नातून विषबाधा झाली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi