Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोमदेव आणि हुईची जोडी फायनलमध्ये!

सोमदेव आणि हुईची जोडी फायनलमध्ये!

वेबदुनिया

लॉस एंजेलिस , सोमवार, 1 ऑगस्ट 2011 (12:25 IST)
एटीपी फार्र्मस क्लासिक टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सोमदेव देववर्मन आणि फिलीपाईन्सचा ट्रिट कोनार्ड हुई पोहोचले.

सोमदेव आणि हुई यांनी शनिवारी येथे झालेल्या उपांत्य फेरीत जोनाथन एर्लिच आणि अँडी राम या चौथ्या मानांकित इस्रायली जोडीचा संघर्षपूर्ण लढतीत 7-6, 6-7, 10-4 असा पराभव केला.

सोमदेव आणि हुई यांनी पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकून आघाडी मिळवली; परंतु दुसरा सेट त्यांनी गमावला. तथापि, सोमदेव आणि हुई यांनी अखेर निर्णायक सेटमध्ये सर्वस्व पणाला लावून 61,9,500 डॉलर्स रकमेच्या हाडकोर्ट स्पर्धेत फायनलचे तिकीट पक्के केले. विजेतेपदाच्या लढतीत सोमदेव आणि हुई यांची लढत बहामाच्या मार्क नोएल्स आणि बेल्जियमच्या झेव्हियर मालिसेच्या तृतीय मानांकित जोडीशी होईल.


Share this Story:

Follow Webdunia marathi