Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्टॅनफोर्ड क्‍लासिक स्पर्धेत सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

स्टॅनफोर्ड क्‍लासिक स्पर्धेत सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

वेबदुनिया

स्टॅनफोर्ड , शनिवार, 30 जुलै 2011 (14:48 IST)
अमेरिकेची "स्टार' टेनिसपटू सेरेना विल्यम्सने स्टॅनफोर्ड क्‍लासिक टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सेरेनाने दुसऱ्या फेरीच्या लढतीत रशियाच्या मारिया किरिलेन्को हिचा प्रतिकार तीन सेटच्या लढतीत 6-2, 3-6, 6-2 असा मोडून काढला. सेरेनाने पहिल्याच फेरीत अनास्तासिया रोडिओनोवा हिचे आव्हान एकही गेम न गमाविता संपुष्टात आणले होते.

एक वर्षाच्या विश्रांतीनंतर सेरेनाने ईस्टबोर्न टेनिस स्पर्धेतून पुनरागमन केले होते. त्यानंतर ती विंबल्डन स्पर्धेतही खेळली होती. दुखापतीनंतर पुनरागमन केल्यावर तिची ही केवळ तिसरीच स्पर्धा आहे. सेरेनाची गाठ आता मारिया शारापोवा हिच्याशी पडेल.


Share this Story:

Follow Webdunia marathi