Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हरली तरी सायनाचा विक्रम

हरली तरी सायनाचा विक्रम
, सोमवार, 17 ऑगस्ट 2015 (09:44 IST)
जागतिक बॅडमिंटन चॅम्पिनशिप स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरण्याचे ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिचे स्वप्न भंगले आहे. जेतेपदासाठी झालेल्या अंतिम लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मारित हिने सायनाचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. सुरुवातीपासूनच तिने आघाडी घेतली. पण, ही आघाडी तिला अखेरपर्यंत टिकवता आली नाही. कॅरोलिनाने जोरदार कमबॅक करत तिला पुन्हा मागे सोडले आणि १९-२१ अशा फरकाने दुसरा सेटही खिशात घातला. यापूर्वी, ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम लढतीतही कॅरोलिनाने सायनाचा पराभव केला होता. 
 
दरम्यान, या स्पर्धेत सायना आजपर्यंत पाच वेळा उपांत्यपूर्व फेरीची वेस सायनाला ओलांडता आली नव्हती. मात्र, यावेळी सायनाने आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा नजराणा पेश करीत यंदाच्या स्पर्धेत थेट अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. त्यामुळे सायनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी तिची ही विक्रमीच कामगिरी आहे. अंतिम सामन्यात सायनाचा पराभव झाला असला तरी तिच्या नावावर एक नवा विक्रम जमा झाला आहे. जागतिक बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय  खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरीत विजय मिळवत तिने हे पदक निश्चित केले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi