Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘फुलराणी’सायना विजेती

‘फुलराणी’सायना विजेती
सिडनी , सोमवार, 13 जून 2016 (07:57 IST)
ऑस्ट्रेलियन खुली बॅडमिंटन स्पर्धा 
फुलराणी सायना नेहवालने चाहत्यांनाच नव्हे तर स्वत:लाही सुखद धक्का देत ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. सायनाने अंतिम फेरीत सून यू हिचा 11-21, 21-14, 21-19 असा पराभव केला.
 
सायनाने तिच्यापेक्षा सरस जागतिक मानांकन असलेल्या वँग हिान हिला उपान्त्य लढतीत दोन गेममध्येच हरवले होते. आता तिने अंतिम फेरीत चीनच्याच सून यू हिचा पहिला गेम गमावूनही जोरदार कमबॅक करत पराभव केला. सायनाने पहिला गेम 11-21 असा गमाविल्यानंतर दुसर्‍या गेममध्ये सुरुवातीपासूनच आघाडी टीकवत 21-14 असा दुसरा गेम जिंकला. त्यानंतर तिसर्‍या निर्णायक गेममध्ये सायना आणि सुन यांच्यात चुरस पाहायला मिळाली. अखेर सायनाने 21-19 अशी बाजी मारत विजेतेपद आपल्या नावावर केले.  
 
या स्पर्धेचे तिने दुस-यांदा विजेतेपद मिळविले आहे. गेल्या काही महिन्यांत साईनाच्या खेळात सातत्याचा अभाव होता. ती अनेक चुका करीत होती, त्यामुळे साईना तर कोर्टवर कुठेच दिसत नाही, असे म्हटले जात असे; पण आज तिने जबरदस्त हुकमत राखत हे विजेतेपद मिळविले आहे. फटक्‍यांची निवड कशी करावी हेच साईनाने दाखवून दिले. तिने बेसलाइनवरून; तसेच कोर्टच्या मध्यावरून मारलेले स्मॅशेस विजयी ठरत होते. या मोसमातील साईनाचे पहिले विजेतेपद आहे. रिओ ऑलिंपिकपूर्वी साईनाने मिळविलेले हे विजेतेपद खूप महत्त्वाचे आहे. यापूर्वी सायनाने आतापर्यंत सुआनविरुद्धच्या सहा लढतींपैकी पाच लढतींमध्ये विजय मिळविला आहे. सायनाने २०१४ मध्ये ऑस्टड्ढेलियन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते मात्र सुपरसीरिजमध्ये तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. 
 
रिओच्या दृष्टीने महत्त्वाचे सायनाची कामगिरी रिओ ऑलिम्पिकआधी उत्साहात भर घालणारी असून, याद्वारे तिने आपण ऑलिम्पिकसाठी फिट असल्याचे संकेतही दिले. सायना २०१४ मध्ये ऑस्टड्ढेलियन ओपन विजेती राहिलेली आहे. काही दिवसांपासून फुुलराणी सायनाची कामगिरी तिला साजेशी होत नव्हती. सायनाचे हे दुसरे ऑस्टड्ढेलियन जेतेपद आहे. आगामी रिओ ऑलिंपिक स्पर्धेआधी तिने मिळवलेले ऑस्टड्ढेलियन ओपनचे जेतेपद तिचा आत्मविश्वास वाढवणारे ठरेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तब्बल 32 मिलियन ट्विटर अकाउंट हॅक