Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2024चे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये होणार

2024चे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये होणार
, बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (12:40 IST)

2020 सालचा ऑलिम्पिक खेळ टोकियोमध्ये खेळले जाणार आहे. त्यानंतर आता 2024 आणि 2028चे ऑलिम्पिकही निश्चित झाले आहे. 2024चे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये तर 2028चे ऑलिम्पिक लॉस एन्जलसमध्ये होणार आहेत.

2024 मध्ये ऑलिम्पिक कुठं होणार यावर बरीच चर्चा झाली होती. पॅरिस आणि लॉस एन्जलस या दोन्ही शहरांनी 2024च्या ऑलिम्पिकसाठी दावा केला होता. या दोन शहरांपैकी एका शहरातच 2024 ऑलिम्पिक होईल हे आय.ओ.सीने निश्चित केलं होतं. या सप्टेंबरमध्ये या दोनातल्या एका शहरावर निश्चिती या दोन शहरांनी चर्चेने करावी अशी आय.ओ.सी.ची इच्छा होती. 2002 नंतर अमेरिकेतल्या शहरात ऑलिम्पिक होण्याची पहिलीच वेळ आहे. या ऑलिम्पिकला अमेरिका एक विजय म्हणून पाहते आहे. या दोन शहरांशिवाय बोस्टन, हॅम्बर्ग, रोम आणि बुडापेस्ट ही शहरंही 2024च्या ऑलिम्पिक शहरांच्या शर्यतीत होते.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटक : ऊर्जा मंत्री डीके शिवकुमार यांच्या घरावर आयकर छापा