Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टोकियो ऑलिम्पिकसाठी एएफआयने 26-सदस्यीय अ‍ॅथलेटिक्स संघाची घोषणा केली

टोकियो ऑलिम्पिकसाठी एएफआयने 26-सदस्यीय अ‍ॅथलेटिक्स संघाची घोषणा केली
, बुधवार, 7 जुलै 2021 (12:52 IST)
अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 26 सदस्यांची पथक जाहीर केली आहे.ऑलिम्पिकमधील ऍथलेटिक्स स्पर्धा 31 जुलैपासून सुरू होतील आणि 9 ऑगस्टपर्यंत चालतील.एएफआयचे अध्यक्ष आदिल जे सुमारीवाला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “एएफआय संघाला दलांकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. 
 
ऑलिम्पिक खेळांसाठी हा शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या उत्तम प्रकारे तयार केलेला दल आहे याचा आम्हाला आनंद आहे. जग बर्‍यापैकी पुढे गेले आहे आणि खेळाडूंना आव्हान देण्यात आले आहे की त्यांनी चांगल्या स्थितीत रहावे,फॉर्म टिकवून ठेवावेत आणि त्यांचे भाव चांगले असावे. लॉकडाउन काढल्यापासून आमचे एथलीटस सतत प्रशिक्षण घेत आहेत याचा आम्हाला आनंद आहे.
 
सुमारीवाला म्हणाले की, 12 एथिलिट्स आणि आमच्या,43400 मीटर मिक्स रिले दलाने ऑलिम्पिकची स्वतःची तिकिटे निश्चित करण्यासाठी वर्ल्ड एथलेटिक्स ने निश्चित केलेले प्रवेश मानक साध्य केले आहेत.दुती चंद (महिला100 मीटर आणि 200 मीटर),एम.पी जाबीर(पुरुष 400 मीटर हर्डल्स), गुरप्रीत सिंग (पुरुषांची 50 किलोमीटर रेस वॉक) आणि अन्नू राणी (महिला भाळा फेक) यांना त्यांच्या क्रमवारीनुसार ऑलिम्पिक तिकीट मिळाले आहे.
 
पूर्ण पथक -
 
पुरुष टीम - अविनाश साबळे (3000 मीटर स्टीपलचेज),एम.पी.जाबीर (400 मीटर हर्डल्स), एमश्रीशंकर (लांब उडी), तजिंदरपालसिंग तूर (शॉट पुट), नीरज चोपडा आणि शिवपाल सिंग (भाळा फेक), केटी इरफान,संदीप कुमार आणि राहुल रोहिल्ला (20 किमी वॉक ) आणि गुरप्रीत सिंग (50 किमी वॉक),अमोज जेकब,आरोकीया राजीव,मोहम्मद अनस, नागनाथन पांडी आणि नोहा निर्मल टॉम (43400 मीटर रिले) आणि सार्थक भांबरी आणि अलेक्स अँटनी (43400 मीटर मिक्स्ड रिले).
 
महिला टीम - दुती चंद (100 मीटर आणि 200मीटर), कमलप्रीत कौर आणि सीमा अंतील-पुनिया (डिस्कस थ्रो), अन्नू राणी (भाळा फेक),भावना जाट आणि प्रियंका गोस्वामी (20 किमी वॉक ) आणि रेवती वीरमानी, सुभा वेंकटेशन आणि धनलक्ष्मी शेखर ( मिश्रित 43400 मीटर रिले).
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर बनणार