अँडी मरेची निराशाजनक कामगिरी कोलोन इनडोअर टेनिस टुर्नामेंटमध्येही चालूच आहे. त्याला पहिल्याच फेरीत फर्नांडो वर्डास्कोकडून पराभव पत्करावा लागला आहे. वर्डास्कोने मरेच्या खराब सर्व्हिसचा लाभ उठवताना 6-4, 6-4 ने विजय नोंदविला. हा सामना जर्मन वेळेनुसार अर्धरात्री संपला.
वर्डास्कोने सामन्यात चारवेळा मरेची सर्व्हिस तोडली. मरे यापूर्वी यूएस ओपनच्या दुसर्याच फेरीत तर फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीतच पराभूत होऊन बाहेर पडला होता. त्याने या दोन्ही स्पर्धेत वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश केला होता. कोलोनमध्येही तो पहिली फेरी पार करण्यात अपयशी ठरला. हा त्याचा इनडोअर हार्डकोटमध्ये 2015 नंतरचा पहिला पराभव ठरला आहे. वर्डास्को पुढच्या फेरीत अग्रमानांकित अॅतलेक्झांडर झ्वेरेव्हला भिडणार आहे. जर्मनीच्या या खेळाडूला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. क्रोएशियाच्या आठव्या मानांकित मारीन सिलिचने पहिल्या फेरीत मार्कोस गिरोनला 6-2, 4-6, 6-3 ने पराभूत केले. आता त्याचा सामना स्पेनच्या अॅवले्रझांडर डेविडोविच फोकिनाशी होईल. फिनलँडच्या क्वालिफायर एमिल रुसुवोरीला 7-5, 6-4 ने पराभूत केले आहे.