Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खेळाडू घडवण्यासोबत डोपिंग रोखणे गरजेचे: अंजू बॉबी जॉर्ज

खेळाडू घडवण्यासोबत डोपिंग रोखणे गरजेचे: अंजू बॉबी जॉर्ज
देशात अनेक युवा खेळाडू चांगली कामगिरी बजावत आहे. त्यांच्यामध्ये चांगली उर्जा असून ते नक्कीच जागतिक दर्जावर चांगली कामगिरी करतील. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असून मी क्रिडा अकादमीच्या काम करत आहे. माझ्याप्रमाणे इतरांनीही गरजूंना मदत करावी असे मत करावे धावपटू अंजू बॉबी जॉर्जने व्यक्त केले आहे. तर डोपिंग ही जागतिक समस्या असून याबाबत प्रशिक्षकाना जागरूक केल्यास डोपिंग रोखता येईल असेही त्यांनी सांगितले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित चौथ्या राष्ट्रीय व नवव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने त्या नाशिकमध्ये आल्या होत्या.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित चौथ्या राष्ट्रीय व नवव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत मुळचा उत्तराखंड येथील व हैदराबाद (गोळकोंडा) येथे कार्यरत सैन्यातील जवान संजय कैरा विजेता ठरला आहे. अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरूष गटात नाशिकचे दामोदर हिराभाई तर महिला गटात नगरची धावपटू अर्चना कोहकडे यांनी बाजी मारली. जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील रौप्यपदक विजेती अंजू बॉबी जॉर्ज हिच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
 
सकाळी साडे सहाला मविप्र मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. यावेळी अंजू बॉबी जॉर्ज हिच्यासह पोलिस आयुक्‍त रवींद्र सिंगल यांच्यासह अन्य मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरवात केली. याप्रसंगी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस व मॅरेथॉन आयोजन समिती अध्यक्षा नीलिमा पवार, संस्थेचे सभापती ऍड. नितीन ठाकरे, अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांच्यासह पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.
 
एकूण सोळा गटात झालेल्या या स्पर्धेतून सुमारे पाच हजारहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. मॅरेथॉन स्पर्धा जिंकण्यात मानसिक क्षमतेचा कस लागतो. त्यामुळे स्पर्धेत कामगिरी करणे आव्हानात्मक असते, असे मत अंजू बॉबी जॉर्ज हिने यावेळी व्यक्‍त केले. दरम्यान स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी धावपटूंचे स्वागत केले. तसेच आपात्कालीन परीस्थितीसाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या.
 
महिला गटातील अर्ध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नगरच्या धावपटूंनी बाजी मारली. नगरच्या अर्चना कोहकडे हिने प्रथम, निशा आगवे द्वितीय, तर जुजा राठोड हिने तिसरा क्रमांक पटकावला.
पुरूषांच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये संजय कैरा याने 2 तास 27.27 मिनीटे अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांकांचे 1 लाख रूपयांचे पारितोषिक पटकावले. तर पुणे डिगी कॅम्पमधील किशार गव्हाणे याने द्वितीय, उत्तराखंड येथील मुळचा व हैदराबाद येथील जवान धर्मेंद्र सिंह रावत याने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात मनसेतून गळती सुरूच, अनेकांचा शिवसेनेत प्रवेश