भारताची स्टार खेळाडू लोव्हलिना बोरगोहेन हिने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिनाने शुक्रवारी (11 नोव्हेंबर) जॉर्डनच्या अम्मानमध्ये इतिहास रचला. तिने 75 किलो गटात अंतिम फेरीत विजय मिळवला. लोव्हलिनाने विजेतेपदाच्या लढतीत उझबेकिस्तानच्या रुझमेटोवा सोखिबाचा 5-0 असा पराभव केला. लोव्हलिना व्यतिरिक्त, परवीन हुडाने 63 किलो गटात, स्वीटीने 81 किलो गटात आणि अल्फिया पठाणने 81+ किलो गटात सुवर्णपदक जिंकले.
तिच्या पहिल्या सामन्यात लोव्हलिनाने कझाकस्तानच्या व्हॅलेंटिना खलजोवावर 3-2 असा विजय मिळवला. या विजयानंतर त्याने आपले पदक निश्चित केले होते.