Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज 11 वा दिवस आहे. या स्पर्धेत भारताला पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच,15 पदके मिळाली. आठव्या दिवशी, नवव्या दिवशी सात आणि दहाव्या दिवशी नऊ. पदके मिळाली.
बॉक्सिंगमध्ये प्रवीण हुड्डाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला चायनीज तैपेईच्या लिनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आणि तिचा प्रवास इथेच संपला.रतीय बॉक्सर परवीन हुड्डा हिला बुधवारी येथे महिलांच्या 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत दोन वेळच्या विश्वविजेत्या चायनीज तैपेईच्या लिन यू टिंगविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.लिनपेक्षा लहान राहिल्याचा परिणाम परवीनलाही भोगावा लागला आणि ती चायनीज तैपेईच्या खेळाडूला पंच करून गुण मिळवण्यात अपयशी ठरली.
पहिल्या फेरीत पिछाडीवर पडल्यानंतर परवीनने दुसऱ्या फेरीत आक्रमक वृत्ती स्वीकारली पण 27 वर्षीय लिनने आपल्या अनुभवाचा उपयोग करून भारतीय खेळाडूचे प्रयत्न हाणून पाडले.