Publish Date: Tue, 14 Mar 2017 (13:35 IST)
Updated Date: Tue, 14 Mar 2017 (13:37 IST)
भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याच्या उरूग्वेचा साथीदार क्यूव्हेस यांना येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील इंडियन वेल्स मास्टर्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत दुहेरीत पहिल्याच फेरीत सर्बियाच्या जोकोव्हिक आणि ट्रोस्की यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. सर्बियाच्या जोतोव्हिक ट्रोस्की आणि बोपण्णा व क्यूव्हेस यांचा 6-2, 3-6, 10-7 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये स्टार टेनिसपटू जोकोव्हिक समोर बोपण्णा क्यूव्हेस जोडीचा टिकाव लागला नाही. परंतु दुसर्या सेटदरम्यान बोपण्णा व क्यूव्हेसने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये पण त्याना निराशाच पदरी पडली.