पुणे येथील रेसिडेन्सी क्लब या कलादालनात देशातील 25 कलाकारांनी काढलेली प्रत्येकी पाच चित्रे याप्रमाणे 125 चित्रांचे प्रदर्शन नुकतेच झाले. यात चोपड्याचे कलाशिक्षक असलेले नागपुरे बंधू यांच्या चित्रांचा समावेश होता. नागपुरे बंधूंनी काढलेल्या चित्रांची भेट प्रदर्शनाचे उद्घाटक ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ब्रेटली यांना देण्यात आली. क्रीडा आणि कलेचा संगम घडविण्याच्या उद्देशाने या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील सी.बी. निकुंभ माध्यमिक विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत वसंत नागपुरे आणि चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरात कला शिक्षक म्हणून कार्यरत पंकज नागपुरे यांची चित्रे मांडण्यात आली होती.