मॅग्नस कार्लसनने सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे.भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने या स्पर्धेत चौथे स्थान पटकावले आहे.कार्लसनने नऊ पैकी आठ गुण मिळवून ब्लिट्झ प्रकारात अव्वल स्थान पटकावले.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कार्लसनने अंतिम दिवशी सात सामने जिंकले आणि दोन अनिर्णित राहिले. त्याने एकूण 26 गुणांसह अव्वल स्थान पटकावले.
चीनच्या वेई यीने 2.5 गुणांच्या आघाडीसह अंतिम दिवशी प्रवेश केला होता, परंतु शेवटच्या नऊ गेममध्ये केवळ पाच गुण मिळवता आले आणि दुसरे स्थान मिळवले.
पोलंडचा डुडा जॅन क्रिस्टोफ19.5 गुणांसह तिसरा, तर प्रज्ञनंद 19 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. भारताचा अर्जुन एरिगेसी 18 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. नोदिरबेक अब्दुसत्तारोव 17.5 गुणांसह सहाव्या, तर किरिल शेवचेन्कोव्ह 17 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
भारताचा अनिश गिरी 14 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. जर्मनीचा व्हिन्सेंट केमर त्याच्यापेक्षा अर्धा गुण मागे नवव्या स्थानावर आहे, तर भारताचा स्टार चेस खेळाडू डी गुकेश, जागतिक चॅम्पियनशिपमधील सर्वात तरुण आव्हानकर्ता, 12.5 गुणांसह 10 व्या स्थानावर आहे.