rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोको गॉफने जिंकले कारकिर्दीतील दुसरे विजेतेपद

Coco Goff
पार्मा , सोमवार, 24 मे 2021 (13:42 IST)
अमेरिकेची 17 वर्षीय टेनिस खेळाडू कोको गॉफ हिने एमिलिया रोमाग्ना ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत वांग कियंगचा सहजच पराभव करत कारकिर्दीतील दुसरे व क्ले कोर्टवरील पहिले विजेतेपद जिंकले.
 
गॉफ महिला जागतिक क्रमवारीत 48 व्या स्थानी असलेल्या चीनच्या खेळाडूविरूध्द 6-1, 6-3 ने विजय नोंदविण्यास केवळ 74 मिनिटांचा वेळ लागला. 
 
गॉफने मागील आठवड्यात इटालियन ओपनमध्ये पहिल्यांदा क्ले कोर्टवर उपान्त्यफेरी गाठली होती. एमिलिया रोमाग्ना ओपन टेनिसची अंतिम लढत जिंकून तिने 30 मे पासून सुरू होणार्यान फ्रेंच ओपनसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. ऑस्ट्रियाच्या लींजमध्ये 2019 साली आपले पहिले विजेतेपद जिंकणार्या गॉफला मागील 26 सामन्यांपैकी 20 सामने जिंकण्यात यश मिळाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून दरमहा 4,950 रुपये मिळवा, डिटेल्स जाणून घ्या