Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CWG: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झालेल्या लष्कराच्या खेळाडूंचा सत्कार केला

CWG: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झालेल्या लष्कराच्या खेळाडूंचा सत्कार केला
, शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (16:50 IST)
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय खेळाडूंनी एकूण 61 पदके जिंकली. यावेळी भारतातील 215 खेळाडू राष्ट्रकुलमध्ये सहभागी होण्यासाठी बर्मिंगहॅमला पोहोचले होते. आता सर्व खेळाडू देशात परतले आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतलेल्या तिन्ही सैन्यदलांच्या खेळाडूंचा गौरव केला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
चित्रात राजनाथ सिंह यांच्यासोबत वेटलिफ्टर गुरुराजा पुजारी आणि विकास ठाकूर, लवप्रीत सिंग, ट्रिपल जम्पर अल्धॉस पॉल आणि अब्दुल्ला अबुबाकर, कुस्तीपटू नवीन, दीपक पुनिया,10,000 रेस वॉकमध्ये कांस्यपदक जिंकणारे संदीप कुमार यांच्यासह अनेक खेळाडू दिसत होते. यावेळी राजनाथ यांनी सर्व खेळाडूंसोबत छायाचित्रेही काढली. 
 
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सची सुरुवात २८ जुलैपासून झाली. 11 दिवसांत हजारो खेळाडूंनी उत्तम कामगिरी आणि कठोर परिश्रम केल्यानंतर, अखेर 8 ऑगस्ट रोजी त्याची सांगता झाली. 2026 मध्ये हे खेळ ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे खेळवले जातील. समारोप समारंभात भारताचे अचंता शरथ कमल आणि निखत जरीन हे ध्वजवाहक होते. 
 
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह एकूण 61 पदकांसह चौथे स्थान पटकावले. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया 67 सुवर्ण, 57 रौप्य आणि 54 कांस्यांसह एकूण 178 पदकांसह प्रथम स्थानावर आहे. इंग्लंड 57 सुवर्ण, 66 रौप्य आणि 53 कांस्यांसह 176 पदकांसह दुसऱ्या तर कॅनडा 26 सुवर्ण, 32 रौप्य आणि 34 कांस्यांसह 92 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपुरात पेट्रोल पिऊन विद्यार्थ्याची कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या