Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गतविजेत्या भारताची विजयाने सुरुवात

hockey
, सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (13:10 IST)
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर आता भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोकी प्रशिक्षण तळावर झालेल्या सामन्यात यजमान चीनविरुद्ध 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली.

या सामन्यात भारतासाठी पहिला गोल सुखजीतने केला, तर उत्तम सिंगने दुसरा तर अभिषेकने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल केला. या स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाचा पुढील सामना 9 सप्टेंबर रोजी जपानी संघाशी होईल आणि त्यानंतर 11 सप्टेंबर रोजी त्यांचा सामना मलेशियन संघाशी होईल

या सामन्यात भारतीय हॉकी संघाचे सातत्यपूर्ण वर्चस्व पाहायला मिळाले ज्यात पहिल्या हाफच्या 14व्या मिनिटाला सुखजीतने गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर उत्तरार्धात उत्तम सिंगने गोल केल्याने भारताला सामन्यात 2-0 अशी आघाडी मिळाली.या स्पर्धेतील भारतीय संघाचा सर्वात मोठा सामना 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी संघाशी होणार आहे.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुस्तीपटू बजरंग पुनिया यांना जीवे मारण्याची धमकी, परदेशी नंबर वरून आला मॅसेज