मलेशियन फ़ुटबाँलपटूवर रविवारी जीवघेणा हल्ला झाला एका शॉपिंग मॉल मध्ये ॲसिड फेकण्यात आले असून या हल्ल्यात खेळाडू होरपळला आहे. फैसल हलीम असे या फ़ुटबाँलपटूचे नाव आहे. फैसल वर क्वालालंपूरच्या बाहेरील पेटलिंग जया जिल्ह्यात हल्ला करण्यात आला. फैसलच्या मानेवर आणि खांद्यावर, हातावर, छातीवर जखमा झाल्या आहे. फैसल म्हणाला - मी या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो. आणि गुन्हेगारांना अटक करण्याची पोलिसांना विनंती करतो. सेलंगोरचे पोलिस प्रमुख म्हणाले या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
हल्ल्यानंतर फैसलचा ऑनलाईन फोटो व्हायरल झाला असून तो एका बेंचवर बसलेला असून त्याच्या हात, खांदा, मानेवर जळल्याचा खुणा दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्याच्या तीन दिवसांपूर्वी फैसलचा एक सहकारी खेळाडू हल्ल्यात जखमी झाला अख्यर रशीद असे या खेळाडूचे नाव असून रशीद हा पूर्वेकडील राज्य तेरेन्गानु मध्ये त्याच्या घराबाहेर पडलेल्या दरोड्यात जखमी झाला. दोन संशयितांनी राशिदवर लोखंडी रॉड ने हल्ला केला. या हल्ल्यात डोक्याला आणि पायाला दुखापत झाली त्याला टाके घालावे लागले. अज्ञात दरोडेखोर राशिदचे पैसे घेऊन पसार झाले.
या दोन्ही हल्ल्यावर मलेशिया फ़ुटबाँल असोसिएशनचे अध्यक्ष हमीदिन मोह्हमद अमीन यांनी या खेळाडूंवर झालेल्या हल्ल्यामुळे निराश आणि दुखी झाले आहे.